नगरपरिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवाकांना संधी मिळावी- युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद साबळे.

काँग्रेस पक्षाचे इंदापूर पक्ष निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर आज(१४जुलै) इंदापूर येथे आले असता इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका युवक काँग्रेसने येणाऱ्या नगरपरिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मध्ये निवडणूक लढवण्यासाठी युवाकांना संधी मिळावी अशी अध्यक्ष इंदापूर तालुका युवक काँग्रेस मिलिंद साबळे यांनी मागणी केली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अभिजीत गोरे,इंदापर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत,इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादर, युवक नेते किरण पासगे, अध्यक्ष इंदापूर शहर सोशल मीडिया नईम शेख ,इंदापूर युवक सरचिटणीस संदीप शिंदे ,अनिकेत जाधव,सिद्धार्थ गायकवाड, एजाज पठाण व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here