धक्कादायक: सोसियल मिडियावर व्हायरल होत असलेल्या समुद्रात बुडालेल्या पर्यटकांच्या व्हिडिओमधील पर्यटक सांगली जिल्ह्यातील तर घटना ओमान मधील.

शहरातील सुपरिचित वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू व त्यांची दोन मुलं ओमान देशातील एका समुद्रकिनारी फिरायला गेले असता लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शशिकांत ऊर्फ विजयकुमार म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी समुद्रात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. रविवारी ही घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता तर बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे.शशिकांत म्हमाणे हे दुबई येथील इंटरनॅशनल कंपनीमध्ये अभियंता आहेत. याठिकाणी शशिकांत त्यांची पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) हे सर्व राहण्यास आहेत.रविवारी ईदची सुट्टी मिळाल्याने म्हमाणे कुटुंबासह इतर मित्र मंडळी ओमान देशात फॅमिलीसह फिरायला गेले होते. दरम्यान, येथील एका समुद्रकिनारी लाटांचा आनंद घेत असताना मागून जोराची लाट आल्यानंतर यामध्ये नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस हा वाहून जात असताना शशिकांत हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले असताना ते ही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी तेथील स्थानिक पथकामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त सांगण्यात आले आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा कुटुंबाकडून करण्यात आलेली नाही. पहा हा थक्क करणारा भयानकव्हिडिओ. https://youtube.com/shorts/TsCZuQ8UMlA?feature=share
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here