माळेगाव- शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीत माजी उपसरपंचाचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माळेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश उत्तमराव पैठणकर वय ४६ रा.पैठणकरवस्ती शिवनगर माळेगांव बु यांचेवर शिवनगर येथिल श्री तुळजाभवानी मंदिरात दि.१० जुलै रात्री ७.३० वा. नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागण्याच्या कारणावरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर रा.शिवनगर माळेगांव याने डोक्यात व पाठीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
दरम्यान फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील यांच्यावर विविध कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीत माजी उपसरपंच सचिन तावरे पाटील याचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान जखमी महेश पैठणकर यांच्यावर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.सदर घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.
Home Uncategorized ‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत माळेगाव बुद्रुक येथील तुळजाभवानी मंदिरात केला एकावर...