पुणे जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा. हवामान खात्याचा रेड अलर्ट
प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
पुणे, महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुणे जिल्हा क्षेत्रात हवामान विभागाने दि.8 जुलै 2022 ते 11 जुलै 2022 या कालावधीत पुणे जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कामाव्यतिरिक्त बाहेर जाणे शक्यतो टाळावे. तसेच पर्यटन स्थळे,धबधबे या ठिकाणी जाणेचे अथवा वास्तव्य करण्याचे टाळावे.असे जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे
भीमा नदीपात्रात पाण्याची पातळी आज 8 जुलै पासून वाढू लागली आहे नदी काठच्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी.