महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कल्चर्ड क्रॉप्स फार्म समूह, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व नेटाफिम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवाद व शिवार फेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुपरकेन नर्सरीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी सर, नेटाफीम इरिगेशन चे श्री. अरुण देशमुख सर, ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार सर,शुगर टेक्नॉलॉजीस्ट श्री. मच्छिन्द्र बोखारे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दौंड तालुक्याचे कृषी अधिकारी मा. श्री राहुल माने सर, तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री.अरुण भागवत, श्री. राजेश थोरात प्रमुख पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी तर सूत्रसंचालन रितेश पोपळघट व आभार माऊली कापसे यांनी मानले.शिवार फेरीचे नियोजन माझ्या शेतावर केले होते.आडसाली लागवड कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळाले. सर्व शेतकरी बांधवानी पाऊस असताना सुद्धा उदंड प्रतिसाद दिला.कल्चर्ड क्रॉप्स फार्म समूह ची टीम व शेतकरी बांधवांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले घोले यांनी….