बावडा: दिनांक 4 जुलै रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी बावडा गावी आली होती. त्यामुळे बावड्या सह पंचक्रोशीतील अनेक भक्तजन पालखीच्या दर्शनासाठी आलेले होते. भक्तिमय वातावरणात जणू बावडा न्हावून निघाले होते. आणि याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी काही भक्त जणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे चित्र समोर आले आहे.
तसं पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यातील पोलिसांची कामगिरी इतर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या मानाने खूप चांगली आहे असे समजले जाते. पुणे जिल्ह्यात पेट्रोलिंग करतात इंदापूर पोलीस स्टेशन चा पहिला नंबर आहे यात शंका नाही परंतु आता एक असा प्रसंग घडला आहे की प्रसंगाने बावडा पोलिसांची मात्र तारांबळ झाली आहे.बावड्याचे रहिवासी असणारे पवनराजे घोगरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन तथा वरिष्ठ कार्यालयात एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये बावड्यातील पालखी सोहळ्याच्या दिवशी त्यांचा भाचा श्रीराज सूर्यवंशी याच्या गळ्यातील चैन चोरी झाली आहे, आम्ही खूप शोधाशोध केली परंतु आम्हाला ती चैन मिळू शकली नाही त्यामुळे पोलिसांनी आम्हाला मदत करून ती चैन मिळवून द्यावी कारण पालखी स्थळाजवळ सुमारे चार ते पाच पोलिसांनी लावलेले फ्लेक्स होते या फ्लेक्स वर हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही च्या नजरेत आहे अशा प्रकारचे लिखाण करून फ्लेक्स जागोजागी लावले होते. म्हणून पवनराजे घोगरे यांनी सिसीटीव्ही फुटेज ची मागणी केली आणि पुढे आली एक धक्कादायक माहिती…सुरुवतीला पवनराजे घोगरे यांना पोलीस स्टेशनमधून वरून कळविण्यात आले की सदरचे फुटेज आपणास ग्रामसेवकाकडे मिळेल म्हणून पवनराजे घोगरे यांनी ग्रामसेवकांना संपर्क केला असता आमच्याकडे उपलब्ध नाही असे सांगण्यात आले. यानंतर मात्र बावडा पोलीस स्टेशन मधून त्यांना सांगण्यात आले की पालखी कार्यक्षेत्रात नुसते फ्लेक्स होते परंतु प्रत्यक्षात सीसीटीव्ही तिथे उपलब्ध नव्हते म्हणून आम्ही आपणास फुटेज पोचू शकत नाही. हे ऐकल्यानंतर चैन मिळण्याची शक्यता पूर्ण मावळली.पोलिसांनी हे फ्लेक्स कदाचित चोरांवर दबाव टाकण्यासाठी केला असला तरी चोरांनी सुद्धा बावडा पोलिसांना तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फसवल्याचे दिसून आले. मात्र सदरच्या फ्लेक्स चे फोटो काढून बावड्याच्या पवनराजे घागरे यांनी पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस खात्यांना लेखी निवेदन देऊन सीसीटीव्ही फुटेज ची मागणी केल्याने पोलीस डिपार्टमेंटची मात्र तारांबळ झाली आहे. आता पवनराजे घोगरे यांना वरिष्ठ कार्यालयातून या निवेदनाचे काय उत्तर मिळेल याच कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एक मात्र नक्की या किस्स्याने पोलिसांनी चोरांना फसवले की चोरांनी पोलिसांना याचीच चर्चा चालू होते..