आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या गरोदर महिलेच्या प्रसूतीसाठी प्रसंगावधान आणि कार्य तत्परतेबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले अभिनंदन..

वैभव पाटील :प्रतिनिधी
मुंबई, ता. ४ : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोटोशी गावातील सीता दिवे या गरोदर महिलेला आरोग्य यंत्रणेने केलेल्या मदतीचे वृत्त समजताच आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे विशेष पत्र देऊन अभिनंदन केले आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या मोखाडा तालुक्यात या महिलेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिकांनी श्रमदानातून रस्ता करून रुग्णवाहिका गावात येण्यास मदत केली. त्याच सोबत शासनाच्या आरोग्य कर्मचाऱ्यानी या महिलेस खोडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दखल करून त्वरीत योग्य ते उपचार दिल्याने सदर महिलेने जुळ्या बालकास जन्म दिला. या प्रसंगात रुग्णवाहिका चालक देविदास पेहरे यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका चालविल्याने त्यांचेही अभिनंदन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.
‘आपल्या सारख्या सतर्क अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगांमध्ये दाखविलेले प्रसंगावधान आणि कार्य तत्परता यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. आपले आणि आपल्या चमूचे हार्दिक अभिनंदन आणि आभार’, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.याबाबत उपसभापती कार्यालयाकडून शिवसेना पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here