देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत व हर्षवर्धन पाटील यांना सहकारमंत्री पद मिळावे म्हणून नृसिह मंदिरात युवकांकडून दुग्ध अभिषेक .  

आज तालुक्यातील नॄसिह मंदिरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवेत म्हणून दुग्ध अभिषेक व साकडे घालण्यात आले.भाजपचे युवा नेते अमोल इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निरा-नरसिंहपुर येथे नॄसिह मंदिरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवेत व राज्यातील शेतकरी बांधवांना योग्य न्याय मिळावा म्हणून दुग्ध अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित अमोल इंगळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना राज्यांत भाजपच्या सरकारात मंत्री पद मिळून राज्याची व इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून दुग्ध अभिषेक व साकडे घातले. यावेळी उपस्थित अमोल इंगळे ,विलास ताटे उपसरपंच, नाथाजी मोहिते मां. सरपंच, किशोर मोहिते उपसरपंच , भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष चिंतामणी गायकवाड,सागर तावरे,अरूण बोडके, दशर्न गायकवाड, निहाल गायकवाड, आर्जुन सुतार, अजित गायकवाड, यशराजअ सागर हराळे, नारायण आसबे गणेश बागल उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here