उपसंपादक निलकंठ भोंग
दि.२६ जून रोजी इंदापूर शहरातील १८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,अडीच वर्षाच्या काळात इंदापूर तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू असून काहीही घडू शकते परंतु आपल्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. आपण इंदापूरचा विकास करण्यासाठी सक्षम असल्याचे यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
उद्या जरी माझे मंत्रिपद गेले तरी तालुक्यातील कोणी म्हणणार नाही की हा मंत्री असताना खुप रुबाब करायचा.. सत्ता असो वा नसो इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांशी बांधील असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला अध्यक्ष उमा इंगोले, स्थानिक सर्व नगरसेवक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.