उपसंपादक-निलकंठ भोंग
इंदापूर तालुका विधी सेवा समितीचे वतीने काल दि. २२ जुन रोजी निमगाव केतकी येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजित करणेत आले होते. सदर कार्यक्रम हा ग्रामपंचायत निमगाव केतकी येथे आयोजित केला होता, या लोकन्यायालयात जेष्ठ विधिज्ञ ॲड.दिलीप पाटील यांनी लोकन्यायालायचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले तसेच अध्यक्ष माजी.न्यायमूर्तीसो डी.डी.कांबळे साहेब यांनी देखील लोकांनी आपआपसातले तंटे लोकन्यायालयात मिटवून घ्यावेत असे आव्हान केले. या फिरत्या लोकन्यायालयात एकूण १० जुने वाद मिटवण्यात आले.यावेळी पॅनलप्रमुख म्हणून मा.न्यायमूर्ती डी.डी.कांबळे साहेब,ॲड.दिलीप पाटील, ॲड.संदीप शेंडे यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमास मा.न्यायमूर्ती डी.डी.कांबळे साहेब,तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.एल.पाटील,सहदिवाणी न्यायाधीश सौ. एस.डी वडगावकर , सहदिवाणी न्यायाधीश के.सी. कलाल,इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.एम. एस.चौधरी व संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, ग्रामपंचायतचे सर्व आजी व माजी सदस्य, इंदापूर न्यायालयाचे कर्मचारी लटांगे ,चिंचकर ,बारवे , नाईकवाडे हजर होते सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी निमगाव केतकीचे सर्व वकील बंधू ॲड.खराडे,ॲड.श्रीकांत करे,ॲड.महेश शिंदे,ॲड.सचिन राऊत, ॲड.रोहित लोणकर,उपाध्यक्ष ॲड.सुभाष भोंग,ॲड.संतोष बोराटे,ॲड.अनिल पाटील, ॲड.सौरभ चिंतामणी यांनी सहकार्य केले,तसेच ग्रामपंचायत निमगाव केतकीने देखील विशेष सहकार्य राहिले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.आर.एस. लोणकर व आभार ॲड.सचिन राऊत यांनी केले.