सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजोन्नती मंडळाचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न

वैभव पाटील :प्रतिनिधी
रविवार दि.19 जून रोजी पालघर तालुक्यातील सफाळे देवभूमी सभागृहात सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजोन्नती मंडळाचे द्विवार्षिकअधिवेशन व सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश शेलार सर होते .यावेळी विद्यार्थी गुणगौरव व गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे व डेपोटी एम एम सीईओ मुंबई हेमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेलार यांनी प्रास्ताविक केले. दहावी, बारावी, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पदवी, पदव्युत्तर व शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी अध्यक्ष सुरेश शेलार, उपाध्यक्ष वैभव पाटील, सरचिटणीस दिवाकर पाटील,विश्वस्त बाळाराम पाटील, हेमनाथ पाटील, विजय पाटील, हरिश्चंद्र वैद्य, भानुकांत सोगले ,खजिनदार नरेश ठाकूर, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील,सहचिटणीस प्रदीप पाटील,भूपेश पाटील,अंतर्गत हिशोब तपासणीस अनंत सोगले ,कार्यकारणी सदस्य संतोष पाटील,अजय पाटील,सुभाष ठाकूर,रवींद्र घरत ,भावेश पाटील,ठाणे पालघर जिल्हा शिक्षक पतपेढी संचालक विलास पाटील कुणबी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील व दिवाकर पाटील यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here