यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा ! सर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन- राज्यमंत्री दत्त्तात्रय भरणे.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.यंदा दहावीचा निकाल हा 96.94 टक्के लागला आहे. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही. त्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की,शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे.परंतू विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा असंही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here