रेडणी,नीरा नरसिंगपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी चालकांवर बावडा पोलीस स्टेशनची रेड.7आरोपींवर गुन्हा दाखल.

बावडा: इंदापूर पोलिस स्टेशन व संबंधित तालुक्यातील दूरक्षेत्र हद्दीतील पोलिस स्टेशन यांनी कोणतीही अवैद्य कामगिरी या तालुक्यात चालू देणार नाही असेच व्रत केलेले दिसते कारण या चार महिन्यांमध्ये दिड कोटी पेक्षा जादा गुटखासह मुद्देमाल पकडून अख्या महाराष्ट्राचे लक्ष इंदापूर पोलिसांनी वेधून घेतले होते. गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर असो हे स्वतः लक्ष घालून अवैद्य धंदे बंद पाडण्यात यशस्वी होत असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या दूरक्षेत्र हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस अधिकाऱ्यांना एक प्रकारे बळ मिळत आहे आणि त्यामुळेच इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील मौजा रेडणी, नीरा नरसिंगपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू विकत आहेत अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे मा.पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या आदेशाने रवाना होऊन इसम नामे १. सुभाष वामन चव्हाण, २. नागेश संजय चव्हाण, ३. अजय संभाजी चव्हाण, ४. जयवंत नामदेव हाके वरील चारही राहणार रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे,५ सयाजी महादेव घोगरे राहणार गणेशवाडी,६. तानाजी जनार्दन भंडलकर, राहणार गिरवी,७. गणेश सहदेव शिंदे, राहणार निरा नरसिंगपूर, हे सर्व इसम बेकायदेशीर अवैधरित्या देशी- विदेशी तसेच पिण्याच्या पाण्याचा जारमध्ये व प्लॅस्टिक ड्रम मधील हातभट्टी गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमा वरती प्रोहिबिशन रेड करून एकूण १५८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन बावडा दूरक्षेत्र येथे यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई माननीय डॉ. अभिनव देशमुख सा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय गणेश इंगळे पोलीस उपाधीक्षक, बारामती विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सपोनि नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक कदम, गायकवाड, कळसाईत, पोलीस शिपाई राखुंडे, विशाल चौधर व बारामती आरसीपी पथक सहाय्यक फौजदार तोंडे व त्यांचा स्टाफ यांनी मिळून केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here