सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष पावडे यांची बिनविरोध निवड.

वैभव पाटील :प्रतिनिधी
मुंबई ते गुजरातच्या सीमेपर्यंत कार्यक्षेत्र असणाऱ्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाच्या सन 2022 ते 2025 करिता कार्यकारणी मंडळ व 2022 ते2028 करिता विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया 13 मे 2022 पासून सुरू झाली होती. दि.14 जून 2022 ही उमेदवारी माघार घेण्याची तारीख असताना समाजातील काही विचारवंतांनी निवडणूक टाळण्यासाठी सर्व उमेदवारांना एकत्र आणून समझोता करणच्या प्रयत्नांना यश आले व सर्व पदे बिनविरोध निवडन्यात आली.
अध्यक्ष – संतोष कृष्णा पावडे पालघर,कार्याध्यक्ष – मुकेश रामचंद्र महाले मुंबई,उपाध्यक्ष – विलास दुंदाजी पाटील गुंदले,जयवंत हरिश्चंद्र राऊळ देलवाडी ,सरचिटणीस – संजय परशुराम पाटील बोरिवली , खजिनदार – रोहिदास ह.पाटील वसई,सह चिटनिस- जयवंत य.राऊळ बोईसर ,अनिल भास्कर पाटील तर विस्वस्तपदी – अशोक लक्ष्मण ठाकूर तांदुळवाडी, विषणुकांत तुकाराम राऊळ बोईसर,शरद काशिनाथ पाटील लालठाणे,विजय बाबुराव पाटील कपासे,विवेक परशुराम कोरे विरार यांची निव बिनविरोध करण्यात आली. समाजामध्ये बांधिलकी व आपुलकी टिकून राहावी सर्वांनी एकत्र येवून समाजाची प्रगती व विकास करावा म्हणून काही पदांचा कालावधी विभागून देण्यात आला.याकामी निवडणूक समिती पुंडलिक घरत , कमळाकर घरत, कमळाकर नाईक,विनोद पाटील,निशांत देसले तर समाजातील विचारवंत मंडळी राजाराम पाटील,जितेंद्र राऊळ, प्रफुल्ल साने,वासुदेव पाटील,सचिन कोरे,राजेश अधिकारी,भालचंद्र पाटील यांनी खूप मोलाची कामगिरी केली सर्व नवनिर्वाचित कमिटीला पुढील कार्यास शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here