इंदापूर: गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. आजही इंदापूर पोलिसांनी एक साजेशी कारवाई केली आहे,आज दिनांक १५ जून रोजी पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्यावर व वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई केली आहे.सदर कारवाईमध्ये सुमारे २५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा गुटखा व २५ लाख रुपयांचा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून ही 5 वी गुटखा विरोधी कारवाई आहे कारवाई आहे. या झालेल्या पाच कारवाई मध्ये तब्बल 1 कोटी 60 लाखाचा मुद्देमालासह गुटखा ताब्यात घेण्यात इंदापूर पोलिस स्टेशनला यश मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक कर्नाटक कडून पुण्याकडे जात असताना इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर येथे या संशयित ट्रकची तपासणी केली असता इंदापूर पोलिसांना ट्रक मध्ये अवैध गुटखा दिसून आला.यामध्ये इंदापूर पोलिसांनी ट्रक चालक व मालक या दोघांवरती भारतीय कलम ३२८ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.सदरची कारवाई ही डॉ. अभिनव देशमुख( पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मिलींद मोहिते (अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग), गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पो हवा अमोल खैरे, पो हवा सुनील बालगुडे, पोना महेंद्र पवार, पो ना मोहम्मद अली मड्डी, पोना बापूसाहेब मोहिते, पो ना सलमान खान, पो ना जगन्नाथ कळसाईत, पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर, लक्ष्मण सूर्यवंशी, अकबर शेख, पोलीस मित्र महादेव गोरवे, शुभम सोनवणे, हनुमंत मोटे, भाऊ कांबळे, अनिल शेवाळे यांनी केली.चौकट:- गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 1 कोटी 60 लाखाचा गुटखा सर्व मुद्देमाल इंदापूर पोलीस स्टेशने हस्तगत केला आहे त्याचप्रमाणे काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंग च्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले असून प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये व इतर सणावरात सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी पेट्रोलिंग ची जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशन च्या ऑफिस परिसरातील साफसफाई ,स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत .