सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे त्रैमासिक वार्षिक अधिवेशन कोकणेर गटातील अनुदानित आश्रम शाळा मासवण येथे रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपेश दत्तात्रय पावडे होते .या कार्यक्रमातअनेक मान्यवरांचे सत्कार व सन्मान करण्यात आले . त्यामध्ये मेघराज शिक्षण संस्था संचालित अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक शाळेचे सहशिक्षक वैभव पद्माकर पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
याआधीही त्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण व सामाजिक वाडा , यांच्याकडून राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षण दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. वैभव पाटील यांना शैक्षणिक , सामाजिक, क्रीडा ,कृषी, सहकार क्षेत्राचा चांगला अनुभव आहे . जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या लोकप्रिय न्यूज पोर्टल चे मुंबई विभाग प्रमुख आहेत .त्यांच्या पत्रकारितेच्या लेखणीतून अनेक अन्यायकारक गोष्टींना वाचा फोडण्याचं काम केले आहे .त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.