इंदापुरातील महिला पोलिस हवलदार माधुरी लडकत यांनी घरी लावलेल्या करवंदिस मुबलक फळे.

इंदापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवलदार माधुरी लडकत यांचे नाव जरी ऐकले तरी गुन्हेगारांची बोलती बंद होते. कर्तव्यदक्ष, सर्वांना समान न्याय देणाऱ्या महिला पोलीस हवलदार माधुरी लडकत यांना खाकी वर्दीतील महिला सिंघम अशी त्यांची ओळख आहे.त्या गोरगरीब, अन्यायग्रस्तांना नेहमी मदत करत असतात,आपली वर्दीतील कर्तव्य बघून त्यांचा समाजकार्यात सुद्धा मोठा मोलाचा वाटा असतो. झाडे लावणे व इतरांनाही झाडे लावण्यास प्रवृत्त करणे हा त्यांचा जणू आवडता छंदच. या महिला सिंघम ने जंगलातील करवंद चक्क त्यांच्या दारात लावले आहे. आणि त्याला फळेसुद्धा आली आहेत. विशेष करून करवंद महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगर कपाती मध्ये आपोआप उगवणारी करवंदाची झाडे आत्ता आपल्या इंदापुरात पोलीस हवलदार माधुरी लडकत यांच्या घरासमोरील अंगणात पाहण्यास मिळत आहे .जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना माधुरी लडकत मॅडम म्हणाल्या, करवंद वर्षातून एकदा येणारे फळ आहे. याला डोंगरची काळी मैना ही म्हणतात. यामध्ये” क “जीवनसत्व असते याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील कमतरता त्वचा रोग नाहीसे होतात .जम्मू-काश्मीर व पंजाब मध्ये हे करवंदाचे झाड कुंपणासाठी व सुगंधी फुलांसाठी लावतात . आता या महिला हवलदार ने लावलेल्या करवंदीच्या झाडाचे फळे चाखण्यासाठी व पहाण्यासाठी त्यांच्या बस डेपो भागात असणाऱ्या राहत्या घरी मित्रमंडळी गर्दी करू लागली आहे. एकूणच या महिला हवलदार चे काम व त्यांनी लावलेली करवंद हे दोन्ही विषय इंदापूरकरांच्या चर्चेचे विषय बनले आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here