नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्या विरोधात भवानीनगर येथे मुकमोर्चा,योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी.

शेळगांव विभाग प्रतिनिधी :-रसूल पठाण
आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात.प्रत्येक धर्मातील लोकांना संविधानाने त्यानुसार राहण्याचा अधिकार दिला आहे. तसेच प्रत्येकाने दुसर्‍याच्या धर्माचा आदर करावा परंतु काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा व सोशल मीडिया चे नवीन जिंदल यांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असा सर्व मुस्लिम समाजाचा आरोप असून त्याच्या निषेधार्थ काल दि. 12/6/2022 रोजी भवानीनगर येथे मुस्लिम समाजाने मुक मोर्चाचे आयोजन केले होते.त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सणसर व भवानीनगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्या विरोधात भवानीनगर येथे छत्रपती कारखाना समोर घोषणाबाजी करण्यात आली व त्या दोघांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here