कुर्डुवाडी मनसे शहराध्यक्षपदी पदी सागर बंदपट्टे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून ऐन कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर ही नियुक्ती झाल्यामुळे कुर्डुवाडी नगर परिषद निवडणूक रंगतदार अवस्थेत होईल अशी चर्चा कुर्डूवाडी मध्ये चालू आहे. राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते सागर बंदपट्टे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .सोलापूर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांच्या नेतृत्वा खाली मी पक्षाची ताकद कुर्डूवाडी शहरात वाढवेल असे सागर बंदपट्टे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले. आणि कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले .सागर बंदपट्टे यांचा पहिल्यापासूनच सामाजिक कामांमध्ये मोठा वाटा असतो. सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन त्यांनी समाज कार्यामध्ये आपला चांगला ठसा उमटवलेला आहे. सागर बंदपट्टे यांनी या अगोदर अनेक संघटनेत पक्षात काम केल्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कुर्डूवाडी शहरामध्ये त्यांना मानणारी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुर्डूवाडी ची नगरपरिषद एकदम चुरशीची होईल अशी चर्चा कुर्डूवाडी मध्ये चालू आहे. .सागर बंदपट्टे यांनी यापूर्वी अनेक संघटनेत पक्षात काम केल्या मुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि त्यामुळे कुर्डूवाडी नगरपरिषदेची निवडणूक सुद्धा चांगलीच रंगतदार होणार अशी चर्चा होऊ लागली आहे . या निवडीचे कुर्डूवाडी मध्ये सर्व स्थरातून स्वागत केले जात आहे . नियुक्ती पत्र देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे .तालुका अध्यक्ष सागर लोकरे.टेंभुर्णी शहर अध्यक्ष अनिल अण्णा आरडे हे उपस्थित होते.सागर बंदपट्टे यांची निवड झाल्यावर माजी नगरसेवक किसन हनवते रावसाहेब मुसळे सोमनाथ सलगऱै. डॉक्टर मोहसिन मकनू. रफिक सय्यद .आनंद हनवते़.साहिल बागवान.यांनी नवीन शहराध्यक्षचा फेटा व हार घालून सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या़.