कंदर, वडशिवणे रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध करमाळा पोलीसात गुन्हा दाखल.

करमाळा प्रतिनिधी(देवा कदम)
वडशिवणे रोडवर मोटारसायकल व छोटा हत्तीमध्ये या दोन वाहनांनमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ६ जून रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कंदर वडशिवणे या रोडवरती घडला होता. या प्रकरणी बाप्पा मघुकर पवार रा.(वडशिवणे ता, करमाळा )यांनी करमाळा पोलीसात याबाबत फिर्याद दिली आहे. सदर माहिती आशी की,माझा भाऊ बाबासाहेब मधुकर पवार व मेव्हणा बिनगेश रूब्या काळे हे त्यांच्या मोटारसायकल (एम.एच. 45 ए.एम. 5869) हि मोटारसायकल घेऊन कंदर येथील दवाखान्यात जात आहे हे सांगून गेले.
त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास भाचा मनोज राजू काळे याने फोनद्वारे मला सांगितले कि, कंदर-वडशिवणे रोडवर एका छोटा हत्तीने जोरात व वेगात येऊन समोरून धडक दिली. या मध्ये माझा भाऊ बाबासाहेब मधुकर पवार व बिगनेश रूबिया काळे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर आम्ही तातडीने उपचारासाठी या दोघांना रूग्णालयात दाखल केले. परंतु माझा भाऊ बाबासाहेब मधुकर पवार हा गंभीर जखमी झाल्या कारणाने तो रात्री दहा वाजता मयत झाला. त्याच्या सोबत असलेला माझा मेव्हणा बिगनेश काळे हा गंभीररित्या जखमी आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here