गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे.काल इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील शहा गावामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक मिलिंद मोहिते , बारामती उपविभागाचे डीवायएसपी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू उपसा करणारी 1 फायबर बोट व 1 सेक्शन बोट अशा 2 बोटी व 3 आरोपींना पकडले असून त्याच्याकडून एकूण 43 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.भादवि कलम 439 व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या खऱ्या बोट मालकापर्यंत पोहचून त्याच्यावरही गुन्हा दाखल करणार अशी पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांनी माहिती दिली.खरतर काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे राजरोसपणे धंदे चालू होते परंतु पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांची टीम प्रत्यक्ष पाहणी करून व धाडी टाकून अशा अवैद्य वाळूचा उपसा करणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणले आहे.
सदरची कारवाई हि डॉ. अभिनव देशमुख (पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक), मिलिंद मोहिते (अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग), गणेश इंगळे (उपविभागीय अधिकारी बारामती ) यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, पो.उप.नि पाडूळे, पो.ना मनोज गायकवाड,पो.कॉ. केसकर, पो. कॉ. शिंगाडे यांनी केली असून सदर प्रकरणाचा तपास सपोनि पवार करीत आहेत.
चौकट:- गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंग च्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले असून प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये व इतर सणावरात सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी पेट्रोलिंग ची जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशन च्या ऑफिस परिसरातील साफसफाई ,स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत .