वैभव पाटील :प्रतिनिधी
कॅथलिक बॅंकेची पंचवार्षिक निवडणूकूक रविवार दिनांक 12 जून रोजी पार पडणार आहे .जस जसे दिवस जवळ येत आहेत तसे वातावरण तापताना दिसत आहे.
सर्वत्र निवडणुकीच्या प्रचार सभा, प्रचार रॅली सुरु आहेत. धर्मग्राम पध्दती नुसार प्रभागाची आखणी करून तिन पॅनल आपापले नशीब अजमावत आहेत. परंतू सर्वत्र पाहता जनहित पॅनल (🛺रिक्षा) चे जोर जास्त दिसत आहे.चूळणे विभागात ठाणे-पालघर शिक्षक संघटना व पतपेढी चे समन्वय अध्यक्ष मायकल सर ह्याचे लहान बंधू संदीप घोन्सलवीस जनहित पॅनल चे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी 🛺 रिक्षा आहे.
संदीप हे M.com, Mphil, MBA, MCA अशा विविध पदव्या व बैंकिंग चा दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत.
रविवारी दि .5 जून रोजी पार पडलेल्या प्रचार रॅली व प्रचार सभेत रणरणत्या उन्हाचा विचार न करता शेकडो कार्यकर्त सहभागी झाले होते.
चूळणे मतदार संघातून संदीप एक तर्फी बाजू मारतील असे चिन्ह सर्वत्र दिसते. अशा उच्च शिक्षित उमेदवारांस संचालक मंडळावर पाठवणे खरोखरच काळाची गरज आहे.असे परिसरातली लोक बोलत आहेत.बँकेच्या विकासासाठी व सभासदांच्या कल्याणासाठी संदीप योग्य उमेदवार आहे अशी सर्वत्र चर्चा आहे.