जिद्दीला कष्टाची साथ दिली तर अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य होतात याचे उदाहरण म्हणजे श्रीगोंदयातील तरुण उद्योजक वैभव मेथा होय
सहसा जैन कुटुंबात शिक्षण घेत असताना पारंपरिक व्यवसाय,धंदा पाहणे हे बाळकडू दिले जाते पण लहानपणापासूनच नवं काहीतरी करायचं या विचाराने जिद्दीने वाटचाल करणाऱ्या दिलीप मेथा व अनिता मेथा या दांपत्य पोटी जन्मलेल्या वैभव याने ऐन १७ व्या वर्षी पारंपारिक व्यवसायात लक्ष न घालता वेगळी वाट शोधली आणि त्याला खुणावत असलेल्या प्लॉट खरेदी विक्री क्षेत्रात प्रवेश केला २००७ सालचा तो काळ आणि वय अवघे १७ !
त्यावेळी ऐतिहासिक आणि पाटपाणी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय शिवाय पुणे,नगरची हद्द त्यामुळे येथील बिगरशेती जागेच्या,शेतजमिनीच्या किंमती पुणे नगरला लाजविल अशा होत्या पुणे,मुंबई येथील बिल्डरांनी येथे प्लॉट,आणि शेतजमिनीत गुंतवणूक केली होती त्यामुळे इमारती गगनचुंबी होण्याऐवजी प्लॉट व शेतीचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे सामान्य गरजवंताला घर बांधणी हे दिवास्वप्न ठरत होते.याला पर्याय म्हणून वैभव याने वस्तीपड आणि बिगरशेती प्लॉट खरेदी तुन अल्प दरात सामान्यांना प्लॉट विक्री सुरू केली..
रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज मधुकर कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरुवात केली आणि लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला अर्थात हे रात्रीतून घडले नाही यासाठी जागा पाहणी खरेदी तद्नंतर ग्राहकांना लोकेशन,आजूबाजूचा अनुकूल परिसर या बाबी ग्राहकांना पटवून देण्याची किमया करावी लागली.श्रीगोंदयातील उपनगरांचा विस्तार आणि जागेची अल्प किंमत यामुळे ग्राहक आकर्षित झाला आणि १५ वर्षात शेकडो नव्हे तर सुमारे २४०० जणांना जागा मालक बनण्याची संधी निर्माण केली.शहराच्या सर्व दिशांना वैभव याने प्लॉटिंग करून ग्राहक मिळवले शहराच्या वैभवात भर पाडल्याचे म्हंटल्यास वावग ठरू नये.
मोठ्या शहरा नंतर श्रीगोंदयात वस्तीपड प्लॉटिंग हा पहिला प्रयोग वैभव याने जिद्द आणि त्याला कष्टाची जोड देऊन यशस्वी केला.वाढत्या किंमती आणि सर्वसामान्यांचे बजेट याची सांगड घातली.याबरोबरच दुचाकी वाहन विक्री क्षेत्रात श्रीगोंदा शहरात संधी असल्याचे हेरून होंडा शोरूम सुरू केले तेथेही शांत संयम आणि मितभाषी स्वभाव तसेच सेवा आणि ग्राहकांना मार्गदर्शन यातून होंडा शोरूम ग्राहकांच्या पसंतीस उतरले नवं करण्याची जिद्द आणि त्याला अविरत कष्टाची साथ यातून वैभव मेथा याने उत्तुंग भरारी घेतली असे नमूद करावे वाटते वैभव सध्या कायद्याचे आणि पत्रकारितेचे शिक्षण घेत असून या क्षेत्रातही तो नावलौकिक मिळवेल हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नसावी आज त्याचा वाढदिवस त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..