बोरी गावामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बोरी ग्रामपंचायतीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी अहिल्यादेवी होळकर कमिटीचे अध्यक्ष किशोर ठोंबरे उपाध्यक्ष ओम देवडे, बोरी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद वाघमोडे , उपसरपंच ज्ञानेश्वर धालपे, माजी सरपंच गजानन देवडे ,ग्रामपंचायत सदस्य हरिदास देवडे, सुहास पाटील, पि.डी.सी. शाखा प्रमुख ज्ञानेश्वर ठोंबरे , बोरी विकास मंच अध्यक्ष सचिन देवडे सर, वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव देवडे , भीमराव पाटील ,जयदीप फ्रुट नितीन भिसे, लालासो भिसे ,बाळासाहेब डफळ संतोष भिटे तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरी गावातील तमाम सर्व नागरिक बंधू-भगिनींना, आबालवृद्धांना, लहान-थोरांना, तरुण तडफदार युवा वर्गाला ,आपल्या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन ,सर्व सदस्य, त्याचप्रमाणे समाज बांधवांना आणि तमाम देशवासीयांना पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तर्फे सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
भरल्या शिवारातील कणसं कापावीत तसे अवघ शत्रू सैन्य कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्यातील झेंडा अटकेपार रोवला ते श्रीमंत सुभेदर मल्हार राव होळकर,
जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर ,
इंग्रजांना याच हिंदुस्तानाच्या मातीमध्ये आपल्या तलवारीने पाणी पाजुन कित्येक वेळा पराभूत करणारे, स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा छत्रपती यशवंतराव होळकर.
त्यागाला ही लाज वाटावी इतका महान त्याग, तुझ्या त्यागाणंच जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान. अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या विश्वमाता राजमाता राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास समाजातील प्रत्येकाला माहीत होणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत, तर समाजातील चुकीच्या धार्मिक आणि सामाजिक चालीरीतींना जाळून त्या स्वतः जगल्या. म्हणूनच आज इथल्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहू शकल्या. हा इतिहास होता अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाचा .हा इतिहास होता अहिल्यादेवीच्या सामाजिक कार्याचा हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या राष्ट्रभक्ती चा आणि राष्ट्रप्रेमाचा .
अखंड भारतामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी पाच हजार पेक्षा जास्त मंदिरे बांधली. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. घाट बांधले. धर्मशाळा बांधल्या. कित्येक अन्नछत्र उभी केली .हे सर्व राज्याच्या तिजोरीतून नाही तर होळकरांच्या स्वतःच्या तिजोरीतून निर्माण केलं. हे एक अहिल्यादेवी होळकर यांचे वैशिष्ट्य होतं.
ज्या ज्या वेळी या सृष्टीमध्ये अन्याय अत्याचारांनी अधर्माचा जन्म होईल ,त्या त्या वेळी या सगळ्यांना संपवणारी एक व्यक्ती जन्माला येईल ,आणि तेच घडलं होतं 31मे 1725 साली. अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी या गावी मराठी वतनदार माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्यारत्न जन्माला आलं. ज्या कन्येच्या तेजान साक्षात सूर्य ही लाजला .याच कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं .
हीच ती अहिल्या सत्याचा मंत्र वापरुन विकासाचे तंत्र या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं.
हीच ती अहिल्या चूल आणि मूल या समाजव्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन एका हातांमध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला .
अखंड हिंदुस्थानात महिलांची फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. पण केवळ तलवार हाती घेऊन चालणार नाही, तलवारी बरोबरच बुद्धिचातुर्य असावं लागतं. त्याचप्रमाणे शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवींना माहित होतं. अशा महापराक्रमी, कुशल शासन, राणी ,महाराणी, वीरांगना, साहसी, दूरदर्शी, न्यायप्रिय, ममताप्रिय, महान समाजसुधारक, धर्मपरायण, लोकमाता, राजमाता ,विश्वमाता, लोककल्याणकारी राष्ट्रमाता, पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन