डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना आगामी विधान परिषदेवर संधी द्यावी- काँग्रेसची मागणी.

सोलापूर जिल्हा सुरुवाती पासूनच कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. सोलापूर जिल्ह्यातील जनतेने कायमच कॉंग्रेसच्या बाजूने कौल देऊन कॉंग्रेसच्या धोरणास पाठिंबा दिला आहे. परंतु काही दिवसापासून कॉंग्रेस पक्षा मध्ये मरगळ आलेली आहे. ती दूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे डॉ. मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक पुन्हा एकदा कॉंग्रेसकडे येण्याचा कल वाढेल व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त होईल असे निवेदन कुर्डूवाडी शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष फिरोज खान यांनी  बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here