प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, ता.दौंड येथील गावालगत असलेल्या जयमल्हार वस्ती शेजारी असणाऱ्या विहरीत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलगा कु. अथर्व दिलीप पोळ याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
शुक्रवारी (दी.27) दुपारी अडीच तीन च्या दरम्यान परिसरातील मुलांसोबत सोबत अथर्व पोळ हा पोहायला शिकण्यासाठी विहरीवर गेला होता.कमरेला मोकळे ड्रम बांधून तो शिकत होता, पाण्यात उडी मारली असताना त्याच्या कमरेला बांधलेला ड्रम सुटून तो विहरित बुडाला. घरी व गावकऱ्यांना ही माहिती मिळताच गावातील युवकांनी विहारीत अथर्व का शोधण्याचा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. त्या नंतर पाणबुड्याच्या साहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व दौंड उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाही साठी पाठऊन रात्री उशिरा अंत्यविधी झाला. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.