इंदापूर तालुक्यात प्रथमच शिरसाटवाडी गावामध्ये बैलगाडी शर्यत उत्साहात…

शेळगाव प्रतिनिधी:- (रसूल पठाण )
दि. 24 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिरसाटवाडी (ता.इंदापूर) येथे करण्यात आले होते. निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांच्या हस्ते या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विकास कदम, भाऊ भुजबळ यांनी केले होते. त्याचे प्रथम पारितोषिक शिरसाटवाडी चे गाडामालक अशोक भुजबळ यांनी पटकावले. बैलगाडा शर्यतीसाठी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा,तसेच महाराष्ट्रातुन बैलगाडा मालक आले होते. बैलगाडा शर्यतीला बरेच वर्षे बंदी होती त्यानंतर हायकोर्टाने परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात ठिक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रथम पारितोषिक ५५,५५५ ₹ लालासाहेब पवार आबा यांच्या हस्ते अशोक भुजबळ यांना देण्यात आले. शर्यत पार पाडण्यासाठी दिपक भुजबळ व छावा संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार सचिन कदम यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here