शिरापुर,दौंड : विविध कार्यकारी सेवा सोसायटी सर्व 13 जागांची बिनविरोध निवड करण्यात आली असून,बिनविरोध निवडी मध्ये भाजपा चे नेते वासुदेव नाना काळे यांच्या पॅनल चे वर्चस्व प्रस्थापित झाले. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक चंदू काका सातव, काशिनाथ महादेव कापसे,गोकर्ण खेडकर यांच्या मध्यस्तीने व समस्त ग्रामस्थ शिरापुर यांच्या सहकार्याने बिनविरोध यशस्वी झाली.नवनिर्वाचित संचालक मंडळात १३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वसाधारण खातेदार प्रतिनिधी म्हणून१) काटकर विकास काळूराम २) कापसे वासुदेव मारुती ३) काळे संभाजी ज्ञानेश्वर ४) घोलप बाळू आप्पा ५) पानवकर निलेश रमेश ६)पासलकर दिपक प्रकाश ७) सातव अमोल विलास ८) सातव अरुण निवृत्ती अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी ९)डाळिंबे हरिभाऊ राजाराम महिला प्रतिनिधी १०)आवचर सुनंदा पंढरीनाथ,११)होलम शालन मारुती,इतर मागास वर्ग प्रतिनिधी१२)कुंभार ललितकुमार भालचंद्र,भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग१३) मरगळे रामचंद्र मुलाजी यानिवडीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी पी.व्ही हराळ यांनी दिले. बिनविरोध निवडीमुळे ,भा.ज.पा किसान मोर्चा नेते वासुदेव नाना काळे, हरिभाऊ ठोंबरे , किसन घोलप,सचिन सुपेकर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.निवडीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी पी.व्ही हराळ यांनी दिले
Home ताज्या-घडामोडी शिरापुर विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध ! भा.ज.पा नेते वासुदेव काळे यांचे वर्चस्व…