श्री स्वामी समर्थ गुरुपिठाची बदनामी करणाऱ्यानवर कडक कारवाई ची मागणी- दौंड समर्थ सेवेकरी

प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
दौंड:त्रंबकेश्र्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपिठची बेकायदेशीर रित्या बदनामी केल्याने सेवेकर्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने खोटे आरोप करणाऱ्या अमर पाटील – पुणे व चंद्रकांत पाठक- नाशिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दौंड मधील शिवराज नगर सेवा केंद्रातील सेवेकर्या नी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची भेट घेउन निवेदन देउन मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसां न पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर गैरव्यवहार चे बिनबुडाचे आरोप सदर व्यक्तीने केले होते.
लक्षावधी सेवेकऱ्या न चे श्रद्धास्थान असलेले गुरुमाऊली यांचे कार्य नेहमीच समाजहित जोपासणारे ठरलेले आहे. आज पर्यंत गुरुमाऊली तसेच गुरुपीठा च्या मार्गदर्शनाखाली देशभर व देशाबाहेर सुद्धा हजारो स्वामी समर्थ सेवा केंद्रावर अनेक लोक हिताचे उपक्रम राबवले जातात.त्यात प्रामुख्याने प्रश्नोत्तरे ,भावी पिढी घडविण्यासाठी बाल संस्कार व युवा संस्कार तसेच शेतकरी न साठी कृषी विभाग व सेंद्रिय शेती यावर मार्गदर्शन व शेतकरी मेळावे घेतले जातात.
अंधश्रद्या बाजूला ठेवून योग्य अध्यात्मिक मार्गदर्शन गुरुमाऊली करत असतात. आयुर्वेदाच्या माध्यमातून आज पर्यंत तज्ञांमार्फत डॉक्टरांच्या माध्यमातून गुरुमाऊली नी गावो गावी हजारो मोफत आरोग्य शिबिरे घेतले व रुग्ण ना आयुर्वेद वर मार्गदर्शन करून समाजाचे आरोग्य निरोगी करण्यासाठी प्रयत्न केले असे सेवेकर्यांचे सांगणे आहे .भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता जपण्यासाठी अनेक ग्रंथातून समाज प्रबोधनाचे काम गुरुमाऊली या कार्यातून अखंडित करत आहेत .
अशा प. पु.गुरुमाऊली व स्वामी मार्ग यांची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात पसरवण्याचे दृष्यकृत्य सदर व्यक्ती करत आहेत.त्यांना लगाम घालने अत्यंत गरजेचे असल्याने त्यांनी केलेले आरोप हे निरर्थक व बिनबुडाचे असल्याचे सेवेकाऱ्यांचे म्हणणे आहे .तरीही अशा लोकांवर तत्काळ फौजदारी स्वरूपाची तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी स्वामी समर्थ सेवेकर्यानी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here