⏰ राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली कौठळी विकास सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेससची एकहाती सत्ता..

इंदापूर|| (कौठळी प्रतिनिधी: अभिजीत खामगळ)इंदापूर तालुक्यातील कौठळी येथील कौठळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे १२- ० ने विजय मिळवत एकहती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत वाघजाई शेतकरी विकास पॅनल विरुद्ध भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल अशी ही प्रमुख लढत होती एकुण १३ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाल्याने दि २२मे २०२२ रोजी १२ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एकुण १३ जागांपैकी १२ जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत वाघजाई शेतकरी विकास पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस वसंत मारकड, कौठळी सरपंच हिरामण मारकड व‌ उपसरपंच पै सुनिल खामगळ, सुभाष पिसाळ मा उपसरपंच श्री भारत चोरमले व श्री शहाजी खामगळ ,मा सरपंच श्री रामचंद्र खामगळ यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डिजे लावुन गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला आहे. सर्व विजयी उमेदवाराचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी अभिनंदन केले.यामध्ये सर्वसाधारण मतदार संघ 👉खामगळ सतीश रामचंद्र, खामगळ ज्ञानदेव एकनाथ, काळेल रमेश गणपत, मारकड भिवा पांडुरंग,मारकड भारत बाबा, खांडेकर ज्ञानदेव बाबा, मारकड विलास तुकाराम, शिंदे सुभाष मोहन.महीला प्रतिनिधी 👉मारकड छाया योगिराज,मारकड संगिता बाळु.इतर मागासवर्गीय👉पिसाळ संतोष नारायण, भ विमुक्त व जमाती 👉खांडेकर हौसराव विठ्ठल यांचा विजयी झाला आहे.तर यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे प्रमोद मुरलीधर चितारे बिनविरोध निवडुन आले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here