एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या श्रीमती ललिता गावडे यांनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रकाशन 2 पुस्तक प्रकाशन 5 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्र 3 शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा 35 तांत्रिक चर्चासत्रे 5 शेतकरी मेळावे व प्रदर्शन आयोजित करून पशू संवर्धन विभागाची प्रतिमा उंचावली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा पशुवैद्यक पुरस्कार जाहीर असून 20मे रोजी सकाळी 11 वाजता शरदचंद्रजी पवार सभागृह पुणे जिल्हा परिषद पुणे येथे वितरण करण्यात येणार आहे.यावेळी श्रीमती ललिता गावडे म्हणाल्या की एका छोट्या 2003 साली खेडेगावातून पशू वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिली मुलगी होत्या.श्री डॉ संतोष गावडे व शिक्षक वर्ग यांचा या यशात मोलाचा वाटा आहे सन 2012 पासून महाराष्ट्र शासन पशू संवर्धन विभागात पशू धन विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत.श्रीमती ललिता गावडे म्हणाल्या हा पुरस्कार माझे पती डॉ संतोष खुटाले माझे कुटुंब शिक्षकांना माझ्या सोबत काम करणारे माझे सहकारी यांना अर्पण करते.