इंदापुर तालुक्यातील अनेक गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार – पो.नि: टी वाय.मुजावर..
इंदापुर || इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणगावातील सराईत गुन्हेगार धनाजी बबन खराडे व सुधीर भारत खराडे यांना इंदापुर, बारामती, दौड, पुरंदर तसेच अ. नगर जिल्यातील कर्जत, सोलापुर जिल्यातील करमाळा व माढा या तालुक्यातुन १ वर्षा करीता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तडीपार केले असून तालुक्यातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करणार असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.
इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणगाव या गावातील सराईत गुन्हेगार धनाजी बबन खराडे व सुधीर भारत खराडे हे गुंड असुन गावातील गुंडप्रवत्तीचे लोक गोळा करून गावात मारमारी करणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, टोळी तयार करणे अश्या प्रकारचे कुत्य ते गेले ३ ते ४ महिण्यापासुन करीत असले बाबत तक्रारी वेग वेगळया लोकांच्या मध्यमातुन वरीष्ठ कार्यलयाकडे पंर्यंत गेल्या होत्या. त्या अनुशंगाने सदर तक्रारीचा पाठपुरवा करून पुर्वीचे त्यांच्या विरूध्द्व व पुर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच प्रमाणे दाखल असलेले खुनाचा गुन्हा व इतर गुन्हे दाखल असताना देखील त्यांच्या मध्ये कसलेही प्रकारेची सुधारण होत नसल्याने व ते समाजामध्ये दहशतीचे वातवरण निर्माण करीत असल्याने त्यांच्या भितीमुळे त्याचे विरुद्ध कोणी हि तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सदर इसमाचा तडीपारचा प्रस्ताव अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, यांच्याकडे पाठवुन सदर प्रस्तावाची चौकशी करून वरील दोन इसमांना पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर, दौंड तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत, सोलापुर जिल्हयातील करमाळा व माढा या संपूर्ण तालुक्यातुन १ वर्षे कालवधी करीता तडीपार करण्यात आले असुन वरील ठिकाणी रहणारे लोंकाना पोलीस स्टेशन तर्फे जाहिर अहवान करण्यात आले आहे कि, वरील सराईत गुन्हेगार इसम नामे धनाजी बबन खराडे व सुधीर भारत खराडे यांना तडीपार केलेले असुन सदर तडीपार इसम हे आपले हद्दीत तडीपार कालवधित दिसुन आल्यास इंदापुर पोलीस स्टेशनला माहिती दयावी महिती देण्या-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल ‘इंदापुर पोलीस स्टेशन ०२१११-२२३३३३ या नंबर वर माहिती दयावी –
इंदापुर पोलीस स्टेशन हददीतील आत्तापर्यंतची तडीपार करण्याची ९ वी कार्यवाही असुन येत्या काही काळात ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य यांच्या होणाऱ्या निवडणुक तसेच इतर कार्यक्रम हे शांततेत पार पाडण्याकरीता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे सराईत गुन्हेगाराची अंदाजे ५० ते ६० लोकांची कुंडली तयार केली असुन त्यांचेवर हि तडीपार / मोक्का या सारखी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कायदा मोडणा-याची आत गैय केली जाणार नाही.
सदरची कार्यवाही तडीपार कार्यवाही हि अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती. तसेच गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांच्या मार्गदशनाखाली १) श्री शेळके पो. नि. (L-C-B) २). टि. वाय. मुजावर पोलीस निरीक्षक इंदापुर पोलीस स्टेशन २) ज्ञानेश्वर धनवे सहा पोलीस निरीक्षक ३) सहा. पोलीस निरीक्षक माने ४) सहा. पो.नि. पाटील ५) सहा. पो. नि. पवार ६)पो. उप. नि. धोत्रे, ६)पो. उप. नि. देठे. ७) पो. उप.नि. पाडुळे ८) महिला पो.उप.नि. जाधव ८) सहा. फौज. जगताप (L-C-B ) ९) दिलीप बरकडे. (S.D.P.O OFFICE ) १०) पो. हवा. प्रवीण भोईटे ११) पो. ना.मोहिते, १२) पो.ना. मोहळे १३) पो.ना. चौधर १४) पो.ना. साळवे १५)महिला.पो.ना.शिंदे १६) पो. कॉ. कोठावळे १७) पो. कॉ. केसकर यांनी केली आहे.