भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी चिंतामणी शरद गायकवाड

बावडा (प्रतिनिधी:अक्षय खरात)-बावडा ता.इंदापुर येथील चिंतामणी शरद गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.चिंतामणी गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जातात.सामाजिक आणि राजकीय कार्य पाहुन व पक्षावरील निष्ठा पाहुन त्यांना भारतीय जनता पार्टी इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.माजी सहकार व संसदीयकार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काल निवडीचे पत्र देण्यात आले.निरा-भिमाचे संचालक उदयसिंह पाटील,राजवर्धन दादा पाटील, मयुर पाटील,बावडा गावचे विद्यामान संरपंच किरन पाटील आदी वरिष्ठ नेतेमंडळींनी या निवडीबद्दल चिंतामणी गायकवाड यांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात तालुक्यातील युवकांचे संघटन करून पक्ष मजबूत करण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेन त्याचप्रमाणे गाव तिथे शाखा अभियान या नवीन अभियानात सुद्धा मी सहभाग घेऊन प्रत्येक गावात भाजपा सक्रिय करणार असल्याचे चिंतामणी गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here