राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या होणार संजय गांधी निराधार योजना मंजुरी पत्र वाटप.

 निरनिमगाव विभाग प्रतिनिधी:अक्षय खरात
शुक्रवार दिनांक ६ मे रोजी इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन येथे सकाळी ९.३० वाजता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते व बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत संजय गांधी निराधार योजना मंजुरी पत्र वाटप होणार आहे. संजय गांधी निराधार योजना चे समितीचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी अपंग व्यक्ती, विधवा महिला, वृद्ध व्यक्ती ,यांना अनुदान मंजुरी पत्र वाटप केले जाणार आहे असे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना मधील पात्र लाभार्थ्यांनीही उपस्थित राहावे त्यांनाही मंजुरी पत्र वाटप होणार आहे असे सागर बाबा मिसाळ यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here