राज्यमंत्र्यांनी केले शेटफळकरांना खुश- शेटफळ हवेली विकास कामांसाठी तब्बल 14 कोटी विकास निधी.शुक्रवारी होणार भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम.

इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाणारे शेटफळ हवेली या गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शेटफळ हवेली यांच्याकडून माहिती मिळाली आहे.
वर्षानुवर्षे विकासपासून वंचित राहिलेल्या शेटफळ हवेली या गावाचा आता कायापालट होणार कारण शेटफळ हवेली ला कधी नव्हे तेवढा तब्बल 14 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेटफळ हवेली कडून सांगण्यात आले आहे.या कामांमध्ये प्रामुख्याने शेटफळ हवेली ते सुरवड भांडगाव रोड 7 कोटी रुपये, शेटफळ हवेली ते नीरा भीमा कारखाना रोड 6 कोटी रुपये,शेटफळ हवेली ते भोंगळे वस्ती रोड 15 लक्ष रुपये, शेटफळ हवेली गावाअंतर्गत कॉंक्रिटीकरण व खडीकरण रस्ते,सामाजिक सभागृह, बंदिस्त गटार योजना व इतर कामे 85 लाख रुपये या सर्व कामांचे उद्घाटन शुक्रवारी शेटफळ हवेली येथे होणार असल्याचे सांगण्यात आले.गावाला कित्येक वर्षांनी डांबरीकरण होणार असल्याने व इतरही छोटे-मोठे कामे होणार असल्याने गावकरी मात्र जाम खुश आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,युवा नेते प्रवीण भैय्या माने ,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here