👉 आपल्या चाहत्याचा नवस पूर्ण करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मारुती चरणी लीन
👉 अचानक आलेल्या प्रसंगाने ना.दत्तामामा ही गेले भारावून.
निंबोडी गावातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक सर्वसामान्य चाहता असणारे श्री. राजेंद्र सुभेदार चव्हाण यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तामामा जोपर्यंत निवडून येत नाहीत तोपर्यंत मंदिरात पाय ठेवणार नाही,आणि निवडून आल्यानंतर स्वतः मामांच्या हस्ते नारळाचे तोरण वाहीन अशाप्रकारचा नवस गावातील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री. मारुती चरणी केला होता.
आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मौजे निंबोडी या ठिकाणी गेले होते.आणि यामध्ये श्री.दीपक पंढरीनाथ खाडे व श्री.रुपेश शिवाजी घंबरे या २ कार्यकर्त्यांनी श्री.चव्हाण यांच्या नवसा बद्दलची माहिती ना.दत्तामामांना दिली असता लागलीच त्यांनी हा नवस पूर्ण करण्याला होकार देत श्री.चव्हाण यांना सोबत घेत मारुती मंदिरा मध्ये स्वतः नारळाचे तोरण अर्पण करून मारुती चरणी लीन झाले.यावेळी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या आपल्या एका सर्वसामान्य चाहत्याने माझ्यासाठी केलेला नवस हीच माझ्या कामाची पावती असून,या प्रसंगी मी खूप भारावून गेलो आहे असे सांगत तालुक्यातील गोरगरीब मायबाप जनता माझ्यावर नित्सीम प्रेम करत आहे त्यांच्या प्रेमाला किंचितही तडा जाऊ देणार नाही असे भावनोद्गार श्री.भरणे यांनी व्यक्त केले.
तसेच सदरील नवसा बद्दल राजेंद्र चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,मी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंधित नसून एक सामान्य कष्टकरी आहे, परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हेच गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना,मजुरांना आपल्या हक्काचा माणुस आहे. गोरगरिबांच्या वेदनांची जाणीव फक्त दत्ता मामांनाच आहे. त्यामुळे सामान्य माणसाविषयी आस्था असणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे भरभरून प्रेम व आशीर्वाद असावीत आणि असा नेता इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावा या भावनेतून मी गावातील मारुती चरणी नवस केला होता. आणि आज स्वतः दत्तामामांच्या हस्ते नारळाचे तोरण वाहत माझा नवस पूर्ण झाला आहे.यामुळे मी आज खूप आनंदी असून भरणे मामांचा राजकीय लेख असाच उंचावत जावो ही प्रार्थना देखील शेवटी त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिनदादा सपकळ,पंचायत समिती सदस्य दादासाहेब वनवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Home Uncategorized आपल्या चाहत्याचा नवस पूर्ण करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मारुती चरणी लीन…..चाहत्याच्या प्रेमाने...