वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
सफाळे बाजारपेठेत करवाले येथील जाॅनी वरगेश यांची सफाळे बाजारपेठेत पार्किंग केलेली दुचाकी हरवलेली होती. याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू करुन काही तासात दुचाकी शोधून दिली. सफाळे पोलिसांची आठवड्याभरात कर्तबगार कामगिरी केल्याची दुसरी घटना असल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
सफाळे बाजारपेठेत जाॅनी वरगेश ( रा. करवाळे) हे अंधेरी येथे लग्नकार्याला जात असताना आपली दुचाकी सफाळे मेडिकल समोर शुक्रवारी सायंकाळी पार्किंगहोती. शनिवारी पहाटे लग्नकार्य होऊन परतले असताना सफाळे बाजारपेठेत पार्किंग केलेली दुचाकी नसल्याने वरगेश यांच्या निर्देशनात आल्याने एकच तारांबळ उडाली. त्यानंतर इतरत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने सफाळे पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी धोंदडे, भावर, दवणे, यांनी शोधमोहीम सुरू केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेक करुन, बाजारपेठे, पार्किंग स्थळ, अशाप्रकारे सर्व शोध घेऊन परिसर पिंजून काढला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवीभुमी कॉम्प्लेक्सच्या बाजूला दुचाकी आढळून आली. ही दुचाकी पहाटेच्या सुमारास भाजी विक्रेत्यांने आणुन ठेवली असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांनी बोलताना सांगितले. दुचाकी मिळाल्याने जाॅनी वरगेश यांनी पोलीसांचे आभार मानले.