मुंबई: महाराष्ट्र शासनाचा प्रशाकीय गतिमानता अभियाना अंतर्गत राज्यस्तर महानगरपालिका या वर्गवारीत उत्कृष्ट प्रशाकीय अधिकारी व सेवा हमी कायद्यांतर्गत विविध सेवा उपलब्ध करून देणे या करीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते इंदापूर तालुक्याचे सुपुत्र तथा मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.दिलीप ढोले यांना नागरी सेवेतील सर्वोच्च पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. या बद्दल प्रशाकीय व सर्वच स्थरातून श्री.दिलीप ढोले साहेब यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.यापूर्वीही आयुक्त दिलीप ढोले यांना शासनस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
“हा पुरस्कार माझ्यासाठी खुप महत्वाचा असून या पुरस्काराचा मी आदर करतो,या पुरस्कारामुळे माझ्या कामाला आणखी गती मिळेल.” असा विश्वास मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.दिलीप ढोले यांनी व्यक्त केला.
Home ताज्या-घडामोडी इंदापूर तालुक्याचे सुपुत्र तथा मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.दिलीप ढोले यांचा मुख्यमंत्र्यांच्या...