👉 कोण लबाड आहे हे इंदापूर तालुक्यातील जनता चांगलच ओळखून आहे-गजानन वाकसे
इंदापूर तालुक्यातील असे कोणते गाव नाही की जिथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रस्ता केला नाही. अशी कोणती वस्ती नाही जेथे हर्षवर्धन पाटील यांच्या निधीतून सभामंडप,समाज मंदिरे झाली नाहीत.आजही जेवढे सार्वजनिक कार्यक्रम व राजकीय सभा होतात त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त कार्यक्रम हे हर्षवर्धन पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपातच होतात.
म्हणून भरणे साहेब कोण लबाड आहे आणि कोणाला जवळ येऊदेऊ नका ? हे इंदापूर तालुक्यातील जनता चांगलच ओळखून असल्याचे भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा प्रभारी पुणे जिल्हा व सोलापूर चे गजानन वाकसे यांनी म्हटले.
गजानन वाकसे म्हणाले की,’ तालुक्यात चालू असलेल्या कामापैकी ७०% कामे केंद्र सरकारच्या निधीतून चालू आहेत.परंतू राज्य मंत्री साहेब सांगतात मीच निधी आणला, आणि नारळ फोडण्याचा धडाका लावला आहे. कॅबिनेट मंत्री असताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील युवकांसाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणली त्यामध्ये राज्य मंत्री भरणे यांनी आणलेला नवीन एक प्रकल्प दाखवावा नाही तर त्या औद्योगिक वसाहतीत भंगारचे टेंडर कुणाचे आहेत ते सांगावे.
आपण आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहात,ज्या भटक्या विमुक्त समाजातील स्वताला सांगता त्या समाजाच्या लोकांच्या घरकुल, स्वच्छ पाणी,गटार योजना या मुलभूत गरजा आपण सात वर्षांत पुर्ण केल्या आहेत का ? त्याचा अपुर्ण अनुशेष कधी भरणार ? त्यांना दिलेले शब्द पाळलेका ? मग लबाड कोण आहे ?
तालुक्यातील जनता हुशार आहे त्यांना कुणी शिकवायची गरज नाही. व्यक्ती गत विकास सध्या कोणाचा चालला आहे हे लोक जाणतात, लोक शांत आहेत परंतू लक्षात ठेवा ते जिल्हा परिषद, पंचायत समिती ला बरोबर उत्तर देतील.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर पोरकटपणा करून काहीही वक्तव्य करणे बंद करावे अन्यथा चोख उत्तर दिले जाईल.’