पुणे जिल्हा परिषदेमार्फत भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी  

प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, ता.दौंड येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी  जि. प.सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या तरतुदीतून पुणे जिल्हा परिषद,पुणे मार्फत 2 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र जि.प. सदस्य वीरधवल जगदाळे यांनी देऊळगाव राजे यात्र समितीस दिले. येत्या (23 आणि 24) तारखेला यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची ग्रामस्थांची तयारी चालू आहे. यात्रा उत्सव गेली दोन वर्ष जागतिक महामारी कोरोना मुळे घेण्यात आला नव्हता . लॉकडाऊन चे नियम शिथिल झाल्यामुळे या वर्षी यात्रेस परवानगी देण्यात आली आहे. या जीर्णोद्धाराच्या कामाने मंदिर सुशोभित होऊन उत्सवास हुरूप येणार असल्याचे दिसून येते. मंदिरासाठी निधी मंजूर करून आणल्याबद्दल देऊळगाव राजे ग्रामस्थ व यात्रा समितीच्या वतीने जगदाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करून आभार मानण्यात आले. या वेळी श्री पोपट खोसरे, श्री जालिंदर सूर्यवंशी,रामभाऊ दुधाट,शामराव आवचर,काका कड आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here