कुर्डूवाडी शहरातील पाणीटंचाईवर योग्य नियोजन करून पाणीपुरवठा योग्यरितीने करावा, हातपंप दुरुस्त करून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुर्डूवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे रासप माढा तालुका अध्यक्ष अभिजीत सोलंकर व मनसे शहराध्यक्ष ओमकार चौधरी यांनी केला आहे .गेले चार ते पाच दिवस झाले कुर्डूवाडी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातपंप ही बंद आहेत तेही त्वरित दुरुस्त करावेत अशी मागणी लोकांमधून केली जात आहे. कुर्डूवाडी नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग किती निष्काळजीपणाने काम करीत आहे यावरून लक्षात येत आहे. तरी पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा आणि नागरिकांचे होत असलेले हाल थांबवावे असे आशयाचे निवेदन आज कुर्डूवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे रा स प माढा तालुका अध्यक्ष अभिजीत सोलंकर व मनसे शहराध्यक्ष ओंकार चौधरी यांनी केली आहे.
Home ताज्या-घडामोडी कुर्डूवाडीमध्ये पाण्याविना होणाऱ्या नागरिकांच्या हालाबद्दल मनसे आणि रासप करणार तीव्र आंदोलन.