राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी “बावडा” येथे स्टॉप घेताच अजून एक पाटील आले सोबतीला!!!

ॲड.बाळासाहेब पाटलांची ३ तारीख झाली फायनल…
बावडा: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश देऊन हर्षवर्धन पाटलांना जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे.३ एप्रिलला होणा-या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून श्री.भरणे यांनी अतिशय मुत्सद्दीपणा दाखवत हर्षवर्धन पाटलांचे कट्टर समजल्या जाणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर,मा.जिल्हा परिषद सदस्या राणी अण्णासाहेब आढाव,पंचायत समितीच्या माजी सभापती स्वाती बापूराव शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना फोडून आपले राजकीय कौशल्य दाखवले आहे.भाजप मधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या पदाधिका-यांची यादी बरीच मोठी असून याविषयी श्री.भरणे यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
त्याचीच रंगीत तालीम आज बावडा येथे झाली.गिरवी येथील कार्यक्रम आटपून श्री.भरणे यांनी बावड्यात स्टॉप घेताच,अजून एक प्रवेश निश्चित केला.माजी सभापती प्रशांत पाटील यांचे सख्खे बंधु ॲड.बाळासाहेब पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांची साथ सोडत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दस्तुरखुद्द हर्षवर्धन पाटलांच्या स्वतःच्या बावडा गावात सुध्दा श्री.भरणे यांनी थेट पाटील फॅमिलीच फोडण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी पंचायत समितीचे सभापती राहिलेल्या प्रशांत पाटील यांनी पहिला धक्का देत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.परंतु त्यांचे बंधु ॲड.बाळासाहेब पाटलांनी भावकी बरोबर राहत हर्षवर्धन पाटलांची साथ सोडण्यास नकार दिला होता.परंतु गेल्या काही दिवसांपासून बावडा गावातील पाटील परिवारामध्ये बरीच अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा बावडा गावामध्ये रंगत आहे.त्याचाच फायदा उठवत श्री.भरणे यांनी थेट बाळासाहेब पाटलांना आपलेसे करत बावडा गावच्या राजकारणाचा नवा “उदय” करून अजून बराच राजकीय “विकास” होणार असल्याचा जणू संदेशच दिला आहे.
👉 हर्षवर्धन पाटलांना शांत झोप कशी लागतेय तेच बघतो
राष्ट्रवादी प्रवेशाविषयी बोलताना ॲड.बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की,बावडा गावची मानाची “पाटीलकी” आमच्या कुटुंबात आहे.आम्ही सुध्दा अनेक चढ-उतार पाहिले आहेत.हर्षवर्धन पाटील राजकारणात आल्यापासून आम्हीसुद्धा त्यांना तन-मन-धनाने साथ दिली आहे.परंतु ते आम्हालाच संपवायलाच चालले आहेत.गेल्या २० वर्षापासून ते आमच्या कुटुंबाला नाहक त्रास देत आलेत.त्यालाच कंटाळून आमचे मोठे बंधु प्रशांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.परंतु घरातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नको म्हणून मी हर्षवर्धन पाटलांसोबत राहिलो.परंतु त्यांनी त्रास देणे काही थांबवले नाही.यातूनच मी भरणे मामांचे नेतृत्व स्विकारून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत असून यापुढे मात्र हर्षवर्धन पाटलांचा सगळाच इतिहास बाहेर काढणार असून त्यांना शांत झोप कशी लागतेय तेच आम्ही बघणार आहोत.त्याचबरोबर भावकीतील अजून बरेच जण राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले यावेळी प्रशांतराव पाटील,सचिन सपकळ,संग्रामसिंह पाटील,सुरेश शिंदे सर,विजय घोगरे,तुकाराम घोगरे,विद्यासागर घोगरे,जालिंदर गायकवाड,दत्तात्रय घोगरे,अशोक चव्हाण,नागेश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here