शिक्षक सभासदांच्या साथीने शिक्षक विकास पॕनल विजयी होणार. – ज्ञानदेव बागल.
दि २३ इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ करिता सत्ताधारी शिक्षक समिती , शिक्षक संघ ( कै शिवाजीराव पाटील गट) व शिक्षक भारती यांचे संयुक्तपणे निवडणूकीसाठी शिक्षक विकास पॕनलच्या माध्यमातून सर्वसाधारण पाच गट व राखीव जागा अशा एकूण २१ जागासाठी एकूण ३२ अर्ज दाखल करण्यात आले.
यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल रुपनवर , माजी चेअरमन हरिश काळेल , शिक्षक नेते सुनिल वाघ , शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष पै सहदेव काळेल यांचेसह विद्यमान चेअरमन वसंत फलफले , व्हा चेअरमन जयप्रकाश कांबळे , नितीन , वाघमोडे उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , कोषाध्यक्ष भारत ननवरे , कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे , सरचिटणीस विनय मखरे , संभाजी काळे , हनुमंत दराडे, सुनिल शिंदे, लतिफ तांबोळी , जुनी पेन्शन इंदापूर अध्यक्ष संतोष हेगडे , आघाडी प्रमुख माजी चेअरमन सुनंदा बोके , शोभा भोसले , जयश्री धाईंजे , पतसंस्थेचे सर्व माजी चेअरमन , संचालक , सचिव , सर्व गटातील उमेदवार , शिक्षक सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.