इंदापूर: आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणुक ही आता भाऊ व मामांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. परंतु याच पार्श्वभूमीतून आगामी काळात इंदापूरचे खरे किंगमेकर ठरणारे ‘शेठ’ यांच्या घरी इच्छुकांनी आपापल्यापरीने सेटिंग लावायला चालू केलेले असल्याचे दिसून आले आहे.
प्रत्येक जण आपापल्या परीने आपली ताकद दाखवत ‘किंगमेकर शेठ’ यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते यामध्ये ‘किंगमेकर शेठ’ यांचे इंदापूर शहरांमधील सर्व पक्ष्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने मामा गटाच्या रांगा थोड्या मोठ्याच आहेत आणि भाऊ पार्टीचे गुडघ्याला बाशिंग बांधलेले नवीन इच्छुक उमेदवार हे देखील रांगेत उभा असल्याचे दिसून आले आहे.खरंतर भाऊ व मामा यांच्याकडे ह्या सेटिंग्स असतील असे वाटत होते. अख्ख्या तालुक्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या भाऊ आणि मामा यांच्याकडे इच्छुक उमेदवार रांगा करतील अशा अपेक्षा होत्या परंतु गेल्या काही वर्षापासून किंगमेकर शेठ यांनी सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध ठेवत कुणालाही आजपर्यंत नाराज केलेले नसल्याने यावेळी शेठ आपली बाजू भक्कम मांडत आपल्यालाच उमेदवारी देतील याच अपेक्षा या रांगेतील इच्छुक उमेदवारांना असाव्यात.प्रभाग रचना त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये असलेले वातावरण(माल है तो ताल है) या दोन्ही गोष्टीचा विचार करून ‘किंगमेकर शेठ’ कोणाला उमेदवारी देणार? त्याचा काय निकष लावणार ?त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारास मतदार स्वीकारेल का? व भविष्यात हा आपल्या सोबत राहील का? या सर्व गोष्टीचा तंतोतंत विचार करून मगच शेठ उमेदवारी देतील हे इच्छुक उमेदवारांना माहीत असल्याने वरील प्रमाणे सर्व निकषात आपण कसे बसत आहोत याचेच स्पष्टीकरण देण्यासाठी कदाचित हे इच्छुक उमेदवार किंगमेकर शेठ यांच्या घरी रांगा करत असतील.आता भाऊ आणि मामा यांना सोडून इंदापूर नगरपालिकेच्या दृष्टीने किंगमेकर शेठ यांच्याच घरी रांगा लागल्याने भविष्यात भाऊ आणि मामांना याच गोष्टींची डोकेदुखी निर्माण होईल का? याबाबतही तर्कवितर्क राजकारणात स्वतःला जाणकार समजणाऱ्यां कडून लावला जात आहे .