गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व शिरूरचे मानसिंह पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व शिरूरचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंहभैया पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली मोराची मध्ये विविध विकास कार्यकारी सोसायटीवर जय मल्हार ग्रामविकास पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व
शिरूर (प्रतिनिधी:सचिन शिंदे) : शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची या गावात विविध विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पाडली. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व शिरूर तालुक्याचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय मानसिंहभैया पाचुंदकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली मोराचीमध्ये विविध कार्यकारी विकास सोसायटी निवडणूकीत जय मल्हार ग्रामविकास पनॅलचे उमेदवार १३ पैकी १० उमेदवार विजय झाले.
यामध्ये विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :थोपटे धनंजय रघुनाथ, धुमाळ सावळा भिकु,नाणेकर नवनाथ रखमा,नाणेकर संभाजी तुकाराम, नाणेकर साहेबराव सिताराम, नाणेकर सुभाष निवृत्ती,करंजकर दत्तात्रय विश्वनाथ, साळे ज्ञानोबा श्रीपती,नाणेकर आरती सूर्याजी, नाणेकर शालन वसंत हे १० उमेदवार जय मल्हार ग्रामविकास पनॅल मधुन निवडुन आले.
तसेच राजा म्हाळसाकांत ग्रामविकास पनॅल चे विजयी ०३ उमेदवार धुमाळ गुलाब पोपट,धुमाळ दत्तात्रय रंगनाथ, धुमाळ बबन तात्याभाऊ असे दोन्ही पनॅलचे मिळून १३ उमेदवार सोसायटीवर निवडुन आले.
धुमाळ रामदास पोपट यांच्या अध्यक्षतेखाली विजयी पनॅल जय मल्हार ग्रामविकास स्थापन झाला होता पनॅल मोठ्या मताने जिंकला पण त्यांना माञ यश आले नाही.त्यांनी सर्वाना बळ दिले होते.रामदास यांच्या जनशक्ती मुळे पनॅल ला यश आले. म्हणून विजयी उमेदवार ने असे ठरविण्यात आले की वि.कार्यकारी सोसायटी बॅक प्रतिनिधी अध्यक्ष पदी नियुक्ती रामदास पोपट धुमाळ यांची करावी.सर्व सामान्य कार्यकर्ता हाच नेता हे या निवडणुकीतील खास वैशिष्ट दिसुन आले.सर्व स्तरातून निवडीबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.
सर्व नेते मंडळी जे वर्षानुवर्ष या विभागाचे नेतृत्व करत होते त्यांचे उमेदवारनी आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here