करमाळा:(प्रतिनिधी: सविता आंधळकर) – महिला दिन फक्त एकदिवस न साजरी करता प्रत्येक दिवशी महिलांचा आदर करावा अशा आधुनिक विचारांवर भर देत पांडे येथील विविध बचत गट आणि एकता व समता या ग्रामसंघातील महिलांनी जागतीक महिला दिन अगदी उत्साहात साजरा केला.एकता व समता ग्रामसंघातील महिलांनी एक हात मदतीचा असे म्हणत सुशीला गोसावी यांसारख्या अनेक स्त्रीयांना किराना किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या सरपंच अनिता मोटे यांनी स्वीकारले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राधा वीर यांची उपस्थिती मोलाची ठरली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मंगल अनिल तेली यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे राधा वीर यांनी त्यांच्या किर्तनामध्ये
माझं दुख, माझं दुख
तयघरात कोंडलं
माझ सुख, माझ सुख
हांड्याझुंबरं टांगलं
माझं दुख, माझं दुख
जशी अंधारली रात
माझ सुख, माझ सुख
हातातली काडवात ”
अशा प्रकारे स्त्रीयांनी न राहता गगन भरारी घेतली पाहिजे असे सांगीतले . तसेच गावामध्ये आपल्या बोलण्या मधुन छाप उमटवणाऱ्या प्रमुख वक्या लता उमाकांत आंधळकर यांनी आपले मनोगत
“चिउताई चिउताई
दार उघड!
दार असं लावून जगावरती कावुन
किती वेळ डोळे मिटून आत बसशील
आपलं मन आपणंच खात बसशील
वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा
दार उघड!
फुलं जशी असतात तसे काटे ही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे ही असतात
गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात
कधी कधी कर्कशः काळे, कावळेच फक्त सगळे असतात
कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के ही बसतील
तरी सुद्धा ह्या जगात वावरावंच लागतं,
आपलं मन सावरावंच लागतं
दार उघड!”या ग.दि. माडगुळकर यांच्या काव्यामधुन स्त्रीयांनी सबल घेणे किती गरजेचे आहे हे सांगीतले.त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यकर्त्या शितल क्षीसागर ,माधुरी वीर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माधुरी वीर यांनी केले.