इंदापुर:इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते होणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले,इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी घेतली आहे.तालुक्यात जवळपास ९८.५ किलोमिटर अंतराचे रस्ते करण्यात येणार आहेत.या रस्त्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.या कामासाठी प्रत्येक किलोमीटर करिता साधारणपणे २५ लाख इतका कमी अधिक प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च असतो या प्रमाणे इंदापूर तालुक्यातील पानंद रस्याकरिता जवळपास २५ कोटी रुपये इतक्या किमतीचे रस्ते होण्यास मदत होईल. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल.
(कंसातील आकडेवारी किलोमिटर अशी वाचावी) या योजनेतून तालुक्यातील अंथूर्णे (३), अजोती (१.५), कचरवाडी (२), कडबनवाडी (४),काझड (४.५), कळंब (१), कळस (१.५), कालठण नंबर २ (३.५), कुरवली (२), गोतंडी (५), गिरवी(२), चाकाटी (७), निमगाव केतकी (४.५), जाधववाडी (१.५), जाचकवस्ती (१.५) झगडेवाडी (५), लोणी देवकर (१), वडापुरी (१.५), वरकुटे खू.(२.५), शहा (१.५), शेळगाव (१),सणसर (१.५), सपकळवाडी (१.५), सरडेवाडी (१.५), सराफवाडी (१.५), हागारेवाडी (१), पिंपरी बु.(१.५), पिटकेश्वर (अर्धा), पिठेवाडी (२), पोंधवडी (१.५), बाभूळगाव (२), बिजवडी (अर्धा), मदनवाडी (१), माळवाडी (१.५), लाकडी (१.५), लासूर्णे (१.५), लुमेवाडी (२), तक्रारवाडी (१.५), तरटगाव (१.५), निमसाखर (५.५), पिंपरी खु.(३), निरगुडे(१.५), निरनिमगाव(१.५),न्हावी(२),पंधारवाडी(१) व पळसदेव(१.५) येथे रस्ते होणार आहेत.