इंदापूरातील महिला शिक्षकांनी लावली अनोखी ‘भिसी’.या आदर्शवत भिसीचे सर्वत्र कौतुक.वाचा सविस्तर

इंदापूर: ( प्रतिनिधी:सूरज काळे ) इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर महिला शिक्षक वर्ग यांनी महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम फेब्रुवारी 2022 पासून सर्व महिला शिक्षकांनी मिळून वाचन संस्कृती जपण्यासाठी शालेय पातळीवर वाचनभिशी हा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक पुस्तक वाचन करतात आणि आपली भिशी लागल्यानंतर वाचलेल्या पुस्तका संदर्भात दीड ते दोन तासाचे समीक्षण चर्चासत्रामध्ये सादर करतात.यामध्ये वैचारिक देवाण-घेवाण होऊन ज्ञान वाढण्यास मदत होते. सदर भिशी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.”वाचाल तर वाचाल” हाच मुख्य हेतू सदर उपक्रमाचा आहे.सध्या आर्थिक व्यवहारातील इंदापूर भिशी प्रकरण गाजत असतानाच इंदापूर मधीलच शिक्षक महिलांनी अशा प्रकारची वेगळीच भिसी लावून समाजाला एक आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यामुळे या अनोख्या भिशीचे कौतुक होत असून यामधून वाचनावर भर देऊन ज्ञानामध्येही भर पडणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.यामध्ये आशा माने, आशा गाढवे, नंदा बनसुडे , दिपाली पाटील, संतोष बनकर, नजमा पठाण, सोनिया कदम, सोनाली कदम, अमृता शिंदे असे सभासद आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here