इंदापूर: इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विकासाची वाहती गंगा अविरत वहात चाललेली आहे. सुरवातीला कौठळी त्यानंतर निरवांगी, वालचंदनगर या भागातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाच्या उद्घाटनानंतर आता इंदापूर तालक्यातील पूर्व दक्षिण भागात रविवार दिनांक ६ मार्च रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सुमारे ४९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असून शहा येथे सायंकाळी ५.३० वाजता जाहीर सभा होणार आहे.
मौजे शहा- १२कोटी १५ लाख, वडापुरी मळशी पुल – १ कोटी, अवसरी येथील पूल ३.५ कोटी, शिरसोडी पुल – १ कोटी, बाभूळगाव, बेडशिंगे – गलांडवाडी नं. २ ते पारेकर – वस्ती- शिरसोडी रस्ता १५ कोटी, गलांडवाडी नं २ – १४ कोटी रस्ता तसेच बाभूळगाव, अवसरी, शिरसोडी, सरडेवाडी, गलांडवाडी नं २, वडापुरी व शहा येथील ४९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप गारटकर (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा ) हे असणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.राजेंद्र तांबिले (अध्यक्ष, मंगल सिद्धी), प्रवीण माने (मा. सभापती आरोग्य व बांधकाम समिती जिल्हा परिषद पुणे), अभिजीत तांबिले (सदस्य जिल्हा परिषद पुणे), हनुमंत बंडगर (सदस्य जिल्हा परिषद पुणे), सतीश पांढरे (सदस्य पंचायत समिती इंदापूर ), प्रशांत बापू पाटील (ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका), हनुमंत कोकाटे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका), सचिन सपकाळ ( सदस्य जिल्हा नियोजन समिती), ॲड. शुभम निंबाळकर (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस),अतुल झगडे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुका), छायाताई पडसळकर (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला इंदापूर तालुका ) आदी उपस्थित राहणार आहेत.