डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.

करमाळा (प्रतिनिधी:सविता आंधळकर): प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये डॉ .धवलासिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या ४ मार्च रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट अशी की,या रक्तदान शिबीरामध्ये ५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना हेल्मेट आणि टिफिन बॉक्स यांचे वाटप अक्षय ब्लड बँक यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा.गणेश करे-पाटील यांनी अध्यक्ष पद भुशविले तसेच प्रमुख अतिथी मा. पोलीस निरीक्षक कोकणे यांची उपस्थिती मोलाची ठरली. यावेळी मनोगत व्यक्त करताना कोकणे यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रस्ता सुरक्षा किती महत्वाचे आहे आणि आपण त्यासाठी आपण रस्ता विषयक सर्व नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्याचबरोबर ” अनंता  एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे. उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे ।अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे शेवटी श्वास जातांना, फुलांचे रंग मी व्हावे।।’ यासारख्या कवी कुसुमागजांच्या काव्यातील प्रेरणादायी काव्यांनी रक्तदानाचे महत्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी समजावून सांगितले . कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे सर, सुक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ प्रविण देशमुख सर, रसायनशास्त्राचे प्राध्यापक चोपडे सर, भोसले सर , वनस्पती शास्त्रप्रमुख सोमनाथ जाधव सर, डॉ.पाटील मॅडम, गायकवाड सर तसेच विद्यालयाचे आजि माजी विद्यार्थी यांची उपस्थितीही मोलाची ठरली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here